प्रतिनिधी / कोल्हापूर
जागतिक स्तरावर पर्यटनातून मोठÎा प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. कोल्हापूर जिह्यातही पर्यटनाला मोठी संधी आहे. त्या अनुषंगाने येथील विविध पर्यटस्थळे पाहण्यासाठी बाहेरील पर्यटक यावेत, यासाठी पर्यटनाचे ब्रँडीग केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिह्यातील प्रत्येक नागरिकांनी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ चे ब्रँडिंग करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे केले. याच कार्यक्रमात प्रशासनाने येथील पर्यटन स्थळांची माहिती योग्य पद्धतीने पर्यटकांपर्यंत पोहोचविल्यास कोल्हापूर जिल्हा पर्यटनामध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केला.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिह्यात दिनांक 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोल्हापूर जिल्हा पर्यटन सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळी मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार सर्वश्री राजेश पाटील, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, प्रा. जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पर्यटन विभागाचे दीपक हरणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी सर्व मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर डेस्टिनेशन' या लोगोचे तर पालकमंत्री पाटील यांच्या हस्तेकोल्हापूर पर्यटन’ या लोगेंचे अनावरण करण्यात आले. तसेच `कोल्हापूर फेस्टिवल’ या कॅलेंडरचे अनावरण खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिह्यात ऐतिहासिक, प्राचीन, नैसर्गिक व आधुनिक पर्यटन स्थळे मोठÎा प्रमाणावर आहेत. या पर्यटन स्थळांसोबतच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण, क्रीडा, कला, उद्योग, कृषी व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची माहितीही येथे येणाया पर्यटकांना द्यावी.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिह्यातील प्रत्येक नागरिक, प्रशासन व खाजगी उद्योजक व्यावसायिक यांनी प्रत्येक ठिकाणी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ हा ब्रँड वापरावा. या ब्रँडचे डिजिटल पद्धतीने मोठÎा प्रमाणावर ब्रॅण्डिंग होऊन पर्यटक येथे आकर्षित झाले पाहिजेत. येथील लोकांमध्ये मोठÎा प्रमाणावर कल्पकता असून खाद्यसंस्कृती ही प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुढील काळात कोल्हापूर जिह्याची ओळख ही महाराष्ट्राची ‘फूड कॅपिटल’ अशी झाली पाहिजे.
खा. माने म्हणाले, जिह्यात ऐतिहासिक, नैसर्गिक पर्यटनाला मोठÎा संधी आहे. पर्यटनात नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्यास मोठÎा प्रमाणावर पर्यटक जिह्यात येतील. पुढील काळात पर्यटनातून मोठÎा प्रमाणात महसूल मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, पर्यटन सप्ताहाच्या माध्यमातून जिह्याचे सर्व समावेशक पर्यटन धोरण ठरविण्यात येणार आहे. यासाठी त्या क्षेत्रात काम करणाया सर्व मान्यवरांचा सहभाग घेऊन प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी उज्वल नागेशकर यांनी मान्यवरांचे आभार मानले.









