वृत्तसंस्था / मॅराकेश (मोरोक्को)
बेल्जियमच्या डेव्हिड गोफीनने एटीपी टूरवरील येथे झालेल्या क्लेकोर्टवरील मॅराकेश पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना स्लोव्हाकियाच्या मॉलकेनचा पराभव केला.
74 व्या मानांकित गोफीनने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात मॉलकेनचा 3-6, 6-3, 6-3 असा पराभव केला. एटीपी टूरवरील गोफीनचे हे सहावे विजेतेपद आहे. गोफीनला विजयासाठी दोन तास झगडावे लागले.









