संगमेश्वरमधील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू, नव्या व्हेरियंटच्या खात्रीमुळे सतर्कता
जिह्यात 507 नवे रुग्ण, 13 मृत्यू
प्रतिनिधी / रत्नागिरी :
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा राज्यातला पहिला मृत्यू रत्नागिरीत झाल्याची नोंद करण्यात आली आह़े संगमेश्वरमधील 80 वर्षीय महिलेला या नव्या व्हेरियंटची लागण झाली होत़ी 13 जून 2021 रोजी तिचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आल़े शुक्रवारी जिह्यामध्ये कोरोनाच्या 507 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिह्यात नव्या व्हेरियंट ऑफ कन्सर्नचे आतापर्यंत 9 रुग्ण आढळून आले आहेत़ त्यापेकी एकाचा मृत्यू झाला असून उर्वरित आठजणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आह़े राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे या नवा व्हेरियंट डेल्टा प्लस असल्याचे सांगत असले तरी जिल्हा प्रशासन केवळ व्हेरियंट ऍाफ कन्सर्न असल्याचेच सांगत आह़े केंद्र शासन, राज्याचे आरोग्यमंत्री `डेल्टा’ची पुष्टी करत असूनही स्थानिक प्रशासन मात्र नरोवा कुंजरोवा भूमिका घेत आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आह़े
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी जिह्यात 7 हजार 131 कोरोना चाचण्यांपैकी आरटीपीसीआर चाचणीत 227, ऍन्टिजेन 166 तर मागील 114 असे एकूण 507 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 59 हजार 563 झाली आह़े 13 मृतांमध्ये चिपळूण 6, दापोली 1, गुहागर 1, लांजा 1, राजापूर 1, संगमेश्वर 1 व रत्नागिरीतील 2 मृत्यूची नोंद करण्यात आल़ी मागील 24 तासात 147 जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या 51 हजार 162 व बरे होण्याचे प्रमाण 86.14 झाले आह़े जिह्याचा मृत्यूदर 2.86 झाला आह़े सध्या 6 हजार 697 रुग्ण उपचारात असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आह़े
नव्या निर्देशांनुसार पॉ†िझटिव्हीटी दर 9.14 टक्के
राज्य सरकारने कोरोना चाचण्यांसदर्भात नवे निर्देश जारी केले आहेत़ त्यानुसार आता केवळ आरटीपीसीआर टेस्टमधील पॉझिटिव्हीटी दर विचारात घेतला जाणार आह़े शुक्रवारी जिह्यात 2 हजार 482 आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 227 रुग्ण आढळून आले आह़ेत. त्यामुळे नव्या निकषांनुसार जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी दर 9.14 असा निश्चित करण्यात आला आह़े
पालकमंत्र्यांकडून जिह्यातील कोरोना स्थितीचा आढावा
जिह्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संवाद साधून आगामी काळात घ्यायच्या खबरदारीबाबत निर्देश दिल़े
जिह्यामध्ये बदल झालेल्या विषाणूच्या बाधेमुळे 9 रुग्ण आढळले. यापैकी संगमेश्वरातील 80 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा या महिलेला इतरही गंभीर आजार होते अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी यावेळी दिल़ी संभाव्य स्थिती लक्षात घेऊन आगामी नियोजन व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देतानाच शासनातर्फे आवश्यक ती मदत तत्काळ देण्याची हमी परब यांनी यावेळी दिल़े.
डेल्टा प्लसची महाराष्ट्रातील रुग्णसंख्या
रत्नागिरी 9
जळगाव 7
मुंबई 2
पालघर 1
ठाणे 1
सिंधुदुर्ग 1
एकूण 21
डेल्टा प्लसची भारतातील संख्या
महाराष्ट्र 21
तामिळनाडू 9
मध्यप्रदेश 7
केरळ 3
पंजाब 2
गुजरात 2
आंध्रप्रदेश 1
जम्मू 1
कर्नाटक 1
ओडिसा 1
राजस्थान 1
एकूण 49
डेल्टा प्लसमुळे नवे निर्बंध नाहीत
पुणे ः डेल्टा प्लसचे राज्यात 21 रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी येथील एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. तथापि या व्हेरियंटमुळे आणखी अतिरिक्त निर्बंध लावले जाणार नाहीत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तिसऱया लाटेसंदर्भात शासन स्तरावर सर्व तयारी झाली आहे. आरोग्य विभागाही सज्ज आहे. रत्नागिरीमध्ये 80 वर्षीय वृद्धेचा झालेला मृत्यू हा डेल्टा व्हेरियंटमुळे झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे हे तपासले जाणार आहे. त्यांचे वय लक्षात घेता मृत्यू केवळ डेल्टा संक्रमणामुळे झाला असे म्हणता येणार नाही. डेल्टा प्लसचे प्रमाण नगण्य असले तरी सध्याच्या रुग्णांमधून त्यांचे सॅम्पल्स घेतले जात आहे. चिंतेचे कारण नसल्याचेही टोपे यांनी सांगितले.
टास्क फोर्समार्फत उपाययोजना
तिसऱया लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. ही लाट थोपवण्यासाठी प्रत्येक जिह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात येऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. या लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.