नवी दिल्ली
संगणक आणि लॅपटॉप बनवणारी कंपनी डेलने नुकताच आपला नवा लॅपटॉप भारतीय बाजारात उतरवला आहे. एक्सपीएस 17 या नव्या लॅपटॉपची कंपनीने घोषणा केली असून ज्याची किंमत सुरूवातीला 2 लाख 9 हजार 500 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. दहाव्या जनरेशन इंटेल कोअर आय 7 प्रोसेसरसह या लॅपटॉपला एनव्हिडीया जी फोर्स जीटीएसटीएम ग्राफिक्सची सोय असेल. 4 के अल्ट्रा एचडीप्लस रेझॉल्युशनच्या स्क्रीनवर चित्रे अत्यंत सुंदरपणे पाहता येतात. आयसेफ डिस्प्ले टेक्नॉलॉजीमुळे स्क्रीनवरील निळय़ा प्रकाशाची प्रखरता तुलनेने कमी पडल्याने याचा वापरकर्त्याच्या डोळय़ांना त्रास होत नाही, असा कंपनीचा दावा आहे. एक्सपीएस 15 प्रमाणे एक्सपीएस 17 मध्येही स्पीकर्ससाठी वेन्स एनएक्स 3 डी ऑडियोचे फिचर असणार आहे. ऍमेझॉन आणि डेलच्या काही निवडक स्टोअर्सवर नवा लॅपटॉप लवकरच विक्रीकरीता उपलब्ध केला जाईल.









