सावंतवाडी/प्रतिनिधी-
बांदा-दोडामार्ग रस्त्यावर डेगवे बाजारवाडी येथे सिमेंट पोत्याची वाहतूक करणारा ट्रक गटारात रूतल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. हा अपघात सोमवारी पहाटे घडला.
त्यानंतर बांदा येथील क्रेन मागवून रुतलेला ट्रक बाजूला हटविण्यात आला. या मार्गावर तिलारी पाईपलाईन, गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करण्यात आली. त्यामुळे अपघात होत आहेत.









