क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
भारतातील सर्वोत्कृष्ट सायकलिंग इव्हेंट डेक्कन क्लिफहँगर ही पुणे ते गोवा 640 कि. मी. 32 तासात पूर्ण करणारी स्पर्धा 20 नोव्हेंबर पहाटे 5 वा. पुणे येथून सुरु होणार असून, 21 रोजी बोगल लोबीज गोवा येथे समाप्त होणार आहे.
शनिवार दि. 20 रोजी परांजपे स्कीम पुणे येथून सुरूवात होणार असून, ही स्पर्धा पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, बेळगाव, चोर्ला घाट मार्गे गोवा समुद्र किनाऱयावर सांगता होणार आहे. हा सायकलिंग प्रकार सोलो श्रेणीतील असून, रेस अक्रॉस अमेरिकेची अधिकृत मान्यता आहे.
5 हजार कि. मी. अल्ट्रा सायकलींग शर्यत असून, ती संपूर्ण अमेरिकन खंडात समुद्र किनाऱयापासून किनारपट्टीपर्यंत जाते. या वषी 50 सायकलपटूंनी सोलो शर्यतीत भाग घेतला असून 40 जणांनी 14 संघामध्ये शर्यतीसाठी नोंद केली आहे. या शर्यतीत बेंगळूर, कोईमतूर, मंगळूर, भोपाळ, बडोदा येथून सायकलपटू भाग घेणार आहेत. इन्फिनिटी स्टुडिओ केंद्र बेळगाव येथील बायसिकल स्टोअर्सचे बिपीन शहा यांच्याकडे ध्वज सुपूर्द करण्यात आले, शनिवार दि. 20 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वा. हे सायकलस्वार बेळगावमार्गे जाणार आहेत. त्या ठिकाणी सायकलपटूंचे स्वागत करण्यात येणार आहे.









