प्रतिनिधी / नागठाणे
डुकराच्या शिकार करून मांसविक्री करत असताना एकास वनविभागाने ताब्यात घेतले.सचिन तुकाराम ताटे ( रा.समर्थगाव,ता.सातारा ) असे अटक केल्याचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार अतीत (ता.सातारा ) येथे काही जण बेकायदेशीररित्या रानडुकराची शिकार करून मांसविक्री करत असल्याची माहिती वनविभागाला समजली. वनविभागाच्या वनपाल कुशल पावरा,वनरक्षक राजकुमार मोसलगी,सुहास भोसले,संजय धोंडवड,मारुती माने,गोरख शिरतोडे यांनी पथक तयार करून गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अतीत ते खोडद दरम्यान असलेल्या शेतात धाड टाकली.
यावेळी तेथून रानडुकराची तुकडे केलेले मास,पायाची खुरे, वजने, चाकू, दोन मोटारसायकल, दोन मोबाईल इत्यादी साहित्यासह संशयित सचिन तुकाराम ताटे यास रंगेहात पकडले. ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी, वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.









