८ नविन चेह-यांना संधी
असळज / प्रतिनिधी
येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाल्याची रितसर घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज केली. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २१ उमेदवारांचेच अर्ज दाखल झाले होते.
कारखाना उभारणीपासून आजतागायत सलग चौथ्यांदा संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवण्यात कारखान्याचे अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांना यश आले आहे. कारखान्याचे अध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील हे विधानपरिषद व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बिनविरोध निवडून आले असून त्यांनी आता कारखान्याची निवडणूकही बिनविरोध करुन हॅट्रट्रिक केली आहे.
कोल्हापूरसह सिंधुदुर्ग जिल्हा हे कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. दुर्गम व डोंगराळ भागात कारखाना असून वेळेत ऊस दर देण्याचा लौकिक कारखान्याने कायम राखला आहे. नव्या संचालक मंडळात ८ नविन चेह-यांना संधी मिळाली आहे.
गटनिहाय बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे :
उत्पादक सभासद प्रतिनिधी गट क्र.१ लोंघे : रामचंद्र लहू पाटील, रविंद्र श्रीपती पाटील, बंडोपंत ज्ञानदेव कोटकर.
गट क्र.२ साळवण : चंद्रकांत भाऊसो खानविलकर, धैर्यशिल भिमराव घाटगे, खंडेराव भाऊसाहेब घाटगे.
गट क्र.३ मांडुकली : मानसिंग उदयसिंह पाटील, महादेव केशव पडवळ, संजय आण्णासो पडवळ.
गट क्र.४ सैतवडे : संजय ज्ञानदेव पाटील, सतेज ज्ञानदेव पाटील, दत्तात्रय बाळासो पाटणकर.
गट क्र.५ वैभववाडी : गुलाबराव शांताराम चव्हाण, जयसिंग हिंदुराव ठाणेकर, प्रभाकर विठोबा तावडे.
सहकारी संस्था प्रतिनिधी : बजरंग ज्ञानू पाटील,
अनुसुचित जाती किंवा जमाती प्रतिनिधी : सहदेव कृष्णा कांबळे,
महिला प्रतिनिधी : वैजयंती मोहन पाटील, वनिता उदय देसाई,
इतर मागासवर्गिय प्रतिनिधी : अभय रामचंद्र बोभाटे,
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी : तानाजी रामचंद्र लांडगे.