प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन डीसीसी बँकेचे संचालक राजेंद्र अंकलगी यांनी जिल्हाधिकाऱयांच्या सहकार्याने डीसीसी बँकेच्या सर्व कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. बँकेचे कर्मचारी व बेळगाव तालुका प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या कर्मचाऱयांना मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले.
याप्रसंगी बँकेचे प्रमुख व्यवस्थापक एस. सी. शेट्टीमनी, तालुका नियंत्रण अधिकारी बी. आर. कुरेर, शाखा व्यवस्थापक एस. बी. बागेवाडी व तालुका बँकेचे संचालक उपस्थित होते. लसीकरणासाठी आरोग्य खात्यातर्फे वसंत पातली, पूर्णिमा तळवार, महांतेश मठद, विजयलक्ष्मी पतंगे उपस्थित होते. राजेंद्र अंकलगी यांनी आभार
मानले.









