वार्ताहर / म्हैसाळ
सभासद नोंदणी व शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील व महानगरातील शाळा भेटी केल्यानंतर प्रामुख्याने डीसीपीएस धारकांच्या हिशोब पत्रिका ही समस्या लक्षात आली आणि या हिशोब पत्रिका मिळवून देण्यासाठीचा सातत्याने पाठपुरावा शिक्षक परिषदेच्यावतीने सुरू आहे.
आज अखेर वेतन पथक कार्यालय शिक्षणाधिकारी कार्यालय, उपसंचालक कार्यालय व मंत्रालय या ठिकाणी एकूण 17 निवेदने देऊन चर्चा केली. प्रत्येक वेळी टाईम लाईन देण्यात आली मात्र आज अखेर हिशोब पत्रिका मिळाल्या नाहीत याचा निषेध म्हणून सोमवार, दिनांक 21- 12-2020 रोजी पलूस ते कोल्हापूर सायकल रॅली काढून उपसंचालक कोल्हापूर यांना या विषयासंदर्भात शेवटचे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात येणार आहे.
डीसीपीएस हिशोब मिळाल्याशिवाय एनपीएसमध्ये समावेश करण्यात येऊ नये ही भूमिका मांडली जाणार आहे, तरी सांगली जिल्ह्यातील डीसीपीएस धारकांनी बहुसंख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कार्यवाह बाळासाहेब चोपडे यांनी केले आहे.यावेळी कार्याध्यक्ष भास्करराव कुंभार, कोषाध्यक्ष रमेश कोष्टी, तालुका अध्यक्ष ए.टी.पाटील, महापालिका अध्यक्ष बजरंग शिंदे, कार्यवाह बाळासाहेब कनके, शहर अध्यक्ष मुकुंद जोग, नवनाथ लाड, ए वाय पाटील इतर पदाधिकारी उपस्थित होते.








