चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
फुटबॉल लव्हर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सुपरलीग फेरीत युनायटेड ब्रदर्सने बीएलएफसीचा तर डीयूएफसीने साईराज एफसीचा पराभव केला.
व्हॅक्सीन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात युनायटेड ब्रदर्सने बीएलएफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 6 व्या मिनिटाला युनायटेड ब्रदर्सच्या साहिलने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ते असफल ठरले. दुसऱया सामन्यात डीयूएफसीने साईराज यूएफसीचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 16 व्या मिनिटाला सर्व्हेश के.ने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 70 व्या मिनिटाला रघु ए.ने दुसरा गोल नोंदवला.
बुधवारचे सामने – युनायटेड ब्रदर्स वि. साईराज यूएफसी दुपारी 2 वा. 2) डीयूएफसी वि. बीएलएफसी सायंकाळी 4 वा.









