मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी डीएलएफने आगामी काळात नव्या प्रकल्पांवर जास्तीत जास्त भर देण्याचे निश्चित केले आहे. 35 दशलक्ष चौ. फू. क्षेत्रफळाच्या जागेमध्ये बांधकाम प्रकल्प उभारले जाणार आहेत. आगामी आर्थिक वर्षात दुसऱया सहामाहीत 8 दशलक्ष चौ. फू. क्षेत्रफळावर प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. पायाभूत सुविधा असणाऱया भागात कंपनी आपले नवे प्रकल्प सर्व सुविधांनीयुक्त राबवणार आहे.









