वृत्तसंस्था/ मुंबई
देशामध्ये महामारीमुळे सर्वाधिक प्रभावीत राहिलेल्या विविध क्षेत्रांपैकी प्रवास आणि पर्यटन उद्योगामध्ये आता काहीशी सुधारणात्मक स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत असून या क्षेत्रातील रोजगार डिसेंबरमध्ये 4 टक्क्यांनी वधारला असल्याची माहिती मॉन्स्टर रोजगार निर्देशांकांच्या एका अहवालानुसार देण्यात आली आहे.
प्राप्त अहवालानुसार हा कल लॉकडाऊनच्या नंतर घरात व विविध निर्बंधांमध्ये अडकून पडलेल्या लोकांनी स्थानिक पर्यटनाला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे तिसऱया लाटेमध्ये भारतीय पर्यटन उद्योगामध्ये नवीन रोजगार क्रमिक पातळीवर एक टक्क्यांनी कमी झाले असल्याचीही माहिती आहे.
2021 मध्ये तेजीत सुधारणा
भारतात प्रवास आणि पर्यटन उद्योगाने 2021 मध्ये कामगिरीत गती प्राप्त केली असल्याचे मॉन्स्टर डॉट कॉमचे सीईओ शेखर गरिसा यांनी स्पष्ट केले आहे.









