सध्या संपूर्ण बॉलीवूडमध्ये चर्चा आहे ती रणबीर कपूर आणि आलिया भटच्या नात्याची. या दोघांचे लग्न कधी होणार याचीही उत्सुकता सर्वांनाच आहे. मध्यंतरी डिसेंबर महिन्यात हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात होते. पण, अभिनेता ऋषी कपूर यांच्या प्रकृतीमुळे हे लग्न पुढे ढकलले जाईल अशी शक्यता निर्माण झाली होती. पण, आता पुन्हा येत्या डिसेंबरमध्येच या दोघांचे लग्न होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात प्रथमच हे दोघे एकत्र झळकणार आहेत. ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट डिसेंबर महिन्यात रिलीज झाल्यानंतर रणबीर आणि आलियाचे लग्न होणार आहे. मुंबईतच हा विवाह सोहळा पार पडणार आहे. डिसेंबर महिन्यात शेवटी हा लग्नसोहळा होणार आहे. सध्या ऋषी कपूर यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 21 डिसेंबरपासून लग्नाच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल असे बोलले जात आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता अजूनही तारखा ठरविण्यात आलेल्या नाहीत.
Previous Articleरात्री दिवेच बंद करा; उपकरणे सुरूच ठेवा : महापारेशन
Next Article भारतातील 83 टक्के कोरोनाबाधित रुग्ण 60 वर्षाखालील
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.