मेणबत्तीच्या डिझाइनवर पेटते लाइट
सद्यकाळात लोकांना वेगवेगळी फॅशन स्वीकारणे चांगले वाटते. कपडय़ांपासून दागिन्यांपर्यंतच्या फॅशन ट्रेंडने बाजार भरून जातो. लोक एकमेकांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आणि सोशल मीडियावर वेगळी स्टाइल स्टेटमेंट तयार करण्यासाठी अजब गोष्टींना स्वतःच्या फॅशनचा हिस्सा करतात. अशीच एक अजब इयरिंग सध्या चर्चेत असून ती घरात लावली जाणारी झूमरच अधिक वाटतेय.
डियाना कॅलडेरिस्कू एक टेक्निकल डिझाइनर आणि फॅशन इलस्ट्रेटर आहे. ती विशेष प्रकारच्या इयरिंग्स तयार करण्यासाठी सध्या चर्चेत आहे. तिने तयार केलेल्या झूमरयुक्त इयरिंग्स दिसण्यास हुबेहुब छतावर लटकणाऱया झूमरसारख्या वाटतात. स्वतःच्या सोशल मीडिया अकौंटवर तिने या विशेष इयरिंग्सची छायाचित्रे शेअर केली आहेत.

धातूने तयार या इयरिंग्सना ब्रास, स्टर्लिंग, सिल्वर, 14 कॅरेट सोने आणि ग्लास क्रिस्टलच्या मदतीने डियानाने तयार केले आहे. यानंतर ती मेणबत्तीचा लुक देण्यासाठी यावर एलईडी लाइट लावते, त्याकडे पाहिल्यास मेणबत्ती पेटत असल्याचा भास होतो. इयरिंग्स घातल्यावर एका छोटय़ाशा बॅटरी पॅकला कानाच्या मागील हिस्स्यावर लावले जाते.
सीआर1632 बॅटरी कितीवेळ ऊर्जा देऊ शकते यासंबंधी अधिक माहिती नाही, परंतु या इयरिंग्स पाहण्यास अत्यंत सुंदर वाटतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याची बॅटरी बदलली जाऊ शकते. या इयरिंग्सची किंमत 12 हजार रुपयांपर्यंत आहे, तसेच याच्या खरेदीवर 1 वर्षांची वॉरंटी देखील मिळते.









