मुंबई : भारतात गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत डिजिटल माध्यमातून होणाऱया आर्थिक व्यवहारात तब्बल सहापट वाढ झाली असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने नुकतीच दिली आहे. रोख पैशाच्या व्यवहारापेक्षा ऑनलाइन किंवा डिजिटलसारख्या माध्यमांतून व्यवहारात चांगलीच वाढ झाली असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. गेल्या 5 वर्षात डिजिटल माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार 2015-16 ते 2019-20 च्या काळात डिजिटल माध्यमातून होणाऱया आर्थिक व्यवहारात 55 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने वाढ झाली आहे.
मार्च 2016 ला 593.61 कोटींवर होणारा व्यवहार मार्च 2020 मध्ये 3 हजार 434.56 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या तुलनेत 2019-20 या आर्थिक वर्षात डिजिटल देवाण-घेवाण मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. कोरोना महामारीच्या प्रभावामुळे डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे.