आरबीआयची माहितीः किरकोळ-घाऊक व्यवहारांमध्ये मोठी वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात केंद्राकडून डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मागील काही दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मागील आठ-नऊ महिन्यांच्या कालावधीत कोरोना संकटाच्या महामारीमुळे सर्व क्षेत्रातील व्यवहार ठप्प राहिल्याने बहुतांशजण घरी बंदीस्त होते. याचदरम्यान आपला दैनंदिन आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर केल्याचे पहावयास मिळाले आहे. नोव्हेंबर 2020 मधील व्यवहारात किरकोळ आणि होलसेल व्यवहारांचा आकडा 24.6 टक्क्यांनी वधारला असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून सादर केली आहे.
रिटेल सेगमेंटमधील नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर(एनइएफटी) देवाणघेवाण वर्षाच्या तुलनेत नोव्हेंबर 2020 मध्ये 24.6 टक्क्यांनी वाढली आहे. हाच आकडा ऑक्टोबरमध्ये 13.9 टक्के राहिला आहे. चालू नोव्हेंबरमध्ये एनइएफटी देवाणघेवाण मूल्य 27.9 टक्के आणि ऑक्टोबरमध्ये 20.1 टक्क्यांनी अधिक राहिले होते.
अन्य डिजिटल व्यवहारासारख्या नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल संकलन(एइटीसी) आणि तत्काळ पेमेंट सेवेमध्ये(आयएमपीएस) मागील महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये मजबूत वृद्धी झाली आहे.
युपीआय व्यवहार 2.2 अब्जने वधारले
मूल्याच्या आधारे युपीआयची देवाणघेवाण 3.9 लाख कोटी रुपये झाली आहे तर आयएमपीएस देवाणघेवाण ही 2.76 लाख कोटी रुपयांची झाली आहे. यासोबतच आरटीजीएस देवाणघेवाण ही 79.8 लाख कोटी रुपये आणि एइएफटीत 22.18 लाख कोटींची उलाढाल झाली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये युपीआय देवाणघेवाण ही मात्र 2.2 अब्जच्या घरात राहिल्याची नेंद केली आहे.









