ग्रामीण भागात मात्र लोक गंभीर नसल्याचे चित्र. मैदानांवर, गल्ली??मध्ये खेळ. काही ठिकाणी युवकांचे घोळके.
डिचोली/प्रतिनिधी
सरकारच्या तीन दिवशीय लॉकडाऊनला डिचोली तालुक्मयातील अनेक भागांमध्ये चांगलाच प्रतिसाद लाभला. डिचोली व साखळी शहरी भागांमध्ये लोकांनी आपली दुकाने तीन दिवस स्वेच्छेने बंद ठेऊन या लॉकडाऊनला सहकार्य केले. मात्र काही ग्रामीण भागमध्ये लोकांकडून हा लॉकडाऊन गांभीर्याने न घेतल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी युवकांच्या गटांकडून मैदानांवर तसेच गल्ली?मध्ये क्रिकेट व इतर खेळ राजरोसपणे खेळण्यात येत होते. त्यामुळे या लॉकडाऊनचा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने काहीजण असंवेदनशील राहिल्याचे दिसून आले.
गुरू. दि. 29 एप्रिल रोजी रात्रीपासून राज्यात लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सध्या राज्यात वेगवानपणे वाढत असलेल्या कोरोना रूग्णांमुळे सर्वत्र या लॉकडाऊनची अंमलबजावणी कडकपणे व्हावी अशीच सर्वांची अपेक्षा होती. त्याचप्रमाणे डिचोली व साखळी शहरातील लोकांनी आपली दुकाने बंदच ठेवली होती. केवळ जिवनावश्यक वस्तु?चीच दुकाने सुरू होती. काही हॉटेल, रेस्टोरंट 50 टक्के ग्राहक या तत्वावर तसेच पार्सल सेवेसाठी खुली होती.
डिचोली तालुक्मयातील डिचोली व साखळी या शहरी भागात लोकांनीही लॉकडाऊन चांगल्या पध्दतीने पाळला. बाजारात आणि दुकानांवर लोक आवश्यकतेप्रमाणेच हजेरी लावत होते. मास्क परिधान करून सामाजिक सुरक्षा अंतर राखून लोकांनी या तीन दिवसांमध्ये आवश्यकतेनुसार खरेदी केली. किराणा दुकानांवर लोकांची झुंबड दिसून आली नाही. लोकांनी कोवीड मार्गदर्शक तत्वे कटाक्षाने पाळलेली दिसून आली. बाजारात चालू असलेल्या काही हॉटेल रेस्टोरंटमध्येही तशी गर्दी नव्हती अनेक हॉटूलमालकांनी आपल्या हॉटेलच्या प्रवेशद्विरावर अडथळे निर्माण करून पार्सल सेवा सुरू ठेवले वली होती. त्याचप्रमाणे काही बार अँड रेस्टोरंटमध्येही ग्राहकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक रेस्टोरंटचे मालक व चालक काळजी घेऊन होते. त्यांच्याकडूनही पार्सल सेवेवरच भर देण्यात आला होता.
ग्रामीण भागात मात्र अगांभिर्यपणाचे दर्शन
य लॉकडाऊनचा अंदाज घेण्यासाठी डिचोली मतदारसंघातील काही ग्रामीण भागांमध्ये फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी काही लोकांना या व्हातरसच्य संसर्गाचे आणि लॉकडाऊनचे काहीच पडून गेलेले नाही असेच चित्र पहायला मिळाले. अनेक ठिकाणी लोक घराबाहेर घोळक्मयाने राहून मास्क नाकाच्या खाली अडकवून गप्पा मारताना दिसत होते. साळ गावात तर काही ठिकाणी युवकांचे क्रिकेट सामने रंगले होते. मास्क परिधान न करता रस्त्याच्या शेजारी युवावर्गाकडून मस्त क्रिकेट सामधा सुरू होते. माडयानी या बंधाऱयावर तर काहीजण आंघोळीसाठी उतरले होते. आमठाणे धरणावर पोहोचले असता एक युवकांचा गट धरणाच्या एका बाजूला ठेवलेल्या पाईपांवर दिवासाढवळय़ाच हातात बियरचे केन घेऊन बसलेला दृष्टीस पडला. तसेच ऊक युगुल धरणाच्या पात्रात उतरून पाण्याच्या बाजूला मस्त सेल्फी मारत होते. तर संध्याकाळच्या वेळी या धरणावर फेऱया मारण्याचे सत्र युवा वर्गाकडून सुरूच होते. अडवलपाल, पीर्ण या ठिकाणी काही लहान मैदानांवर युवा पिढीकडून क्रिडा सामने खेळले जात होते.
सध्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट सुरू असून हा व्हायरस अत्यंत भयानक असल्याचे सध्या वाढत असलेल्या रूग्णांच्या संख्येवरून दिसून येत आहे. असे असल्यानेच सरकारने हे लॉकडाऊन जाहिर केले होते. मात्र काही ठिकाणी लोकांकडून या लॉकडाऊनची अंमलबजावणी गंभीररीत्या झाल्याचे दिसून आले आहे. “घरीच रहा, सुरक्षित रहा” या मंत्राचा अनेकांना विसरच पडल्याचे दिसून आले. गावात पोलिसांची गाडी आल्याची कुणकुण लागताच सर्वजण आपापल्या किंवा आहे त्या भागातील लोकांच्या घरात घुसून स्वतःला सुरक्षित ठेवत होते. मात्र आपल्यामुळे कदाचित इतरांना आणि इतरांमुळे आपल्याला या व्हायरसच संसंर्ग होऊ शकतो, याची जाणीव या असंवेदनशील लोकांना नव्हतीच.
डिचोलीतील मद्य विक्री दुकाने बंद पाडली ?
लॉकडाऊन सुरू होऊनही डिचोली साखळी येथील मद्य विक्री दुकाने उघडीच होती. त्यांना अबकारी खात्याकडून लॉकडाऊन काळात दुकाने बंद ठेवण्याची कोणतीही सुचना न आल्याने त्यांनी आपली दुकाने सुरूच ठेवली होती. मात्र काल रविवारी सकाळी डिचोली पोलिसांकडून सुरू असलेली मद्य विक्री दुकाने बंद करण्याचे आदेश दुकानमालकांना देण्यात आले. त्यानंतर दुकानमालकांनघ आपली दुकाने बंद केली. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रात मद्य खरेदीसाठी आलेल्यांची धांदल उडाली.
डिचोली व साखळी बाजारात शुकशुकाट
लॉकडाऊन असल्याने डिचोली व साखळी बाजारातील केवळ जिवनावश्यक वस्तु?ची दुकाने सोडल्यास इतर सर्व दुकाने दिवसभर बंदच राहिल्याने दुपारनंतर बाजारात शुकशुकाट पसरला होता. सकाळच्या सत्रात बाजारात काही प्रमाणात लोकांची वर्दळ दिसून आली. त्यानंतर बाजारात केवळ शांतता पसरली होती. भाजी व फळ विपेते ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसले होते. तसेच पारंपरिक गावठी भाजी व फळविपेतेही ग्राहकांच्या प्रतिक्षेत होते. बाजारातील मुख्य सर्व ठिकाणे निर्मनुष्य बनली होती









