निलेश टोपले यांची अध्यक्षपदी निवड. सचिवपदी डॉ. प्रविण सावंत, खजिनदारपदी शेखर नाईक. यशस्वी कामगिरी करण्यासाठी वावरणार.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली सम्राट क्लबच्या 2022 – 23 या सालासाठी निवडण्यात आलेल्या नवीन कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक निलेश टोपले यांची निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण सोहळा बुध. दि. 12 ऑक्टो. रोजी रात्री 7.30 वा. वाठादेव सर्वण डिचोली येथील मोमेन्ट्स सभागृहात होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या नवीन कार्यकारिणीच्या सचिवपदी डॉ. प्रविण सावंत तर खजिनदारपदी शेखर नाईक यांची निवड करण्यात आली आहे.
डिचोली सम्राट क्लबने मागील वषी अध्यक्ष शिवदास कवठणकर, सचिव सत्यवान नाईक यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या भरीव कामगिरीमुळे या क्लबने राज्य पातळीवर दुसरे बक्षीस पटकावले आहे. याच प्रकारची कामगिरी येणाऱया वर्षभरात करून या डिचोली सम्राट क्लबचे नाव राज्यात अव्वल आणण्यासाठी कार्य करणार. येत्या वर्षभरासाठी अनेक नवनवीन संकल्पना, उपक्रम व कार्यक्रम मनात असून ते सर्व सत्यात उतरून कार्य करण्यासाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश टोपले यांनी पत्रकार परिषदेत केले.
सम्राट क्लबच्या ध्येयधोरणांप्रमाणे कला व संस्कृतीशी निगडित कार्यक्रम व उपक्रम करण्यात येणार आहे. राज्य क्लबतर्फे देण्यात येणारे कार्यक्रम हाती घेतानाच विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. कला, संस्कृतीबरोबरच आपल्या परंपरेशी संबंधित कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाणार, असे यावेळी नवनिर्वाचित सचिव डॉ. प्रविण सावंत यांनी सांगितले.
डिचोली सम्राट क्लबने सदैव चांगली कामगिरी बजावताना राज्यात आपे नाव ठेवले आहे. सर्व कार्यक्रम सुनियोजित स्वरूपात सादर करताना नवीन क्लब स्थापन करणे अशी चांगली कामगिरी बजावली आहे. अशीच कामगिरी यावषीही करण्यात येणार असल्याचे खजिनदार शेखर नाईक यांनी म्हटले.
या पत्रकार परिषदेला नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश टोपले, सचिव डॉ. प्रविण सावंत, खजिनदार शेखर नाईक, शिवदास कवठणकर, सत्यवान नाईक व भावी अध्यक्ष राहुल कवळेकर यांची उपस्थिती होती.









