अनेक ठिकाणी झाडांची पडझड. मोठी हानी नाही. पाणी तुंबण्याचे प्रकिर सुरूच. डिचोली मामलेदारांची तालुक्मयातील सर्व तलाठय़ांना सुचना.
डिचोली / प्रतिनिधी
सोम. दि. 1 जून पासून सुरू झालेल्या पावसाने डिचोली तालुक्मयाला सलग तिसऱया दिवशीही झोडपले दिवसभर पावसाळी वातावरण व पाऊसच असल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तसेच काही ठिकाणी झाडांचीही पडझड झाली असून मोठी हानी नोंद झालेली नाही. डिचोलीचे मामलेकर प्रवीणजय पंडित यांनी तालुक्मयातील सर्व तलाठी आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱयांना सुचना देत आपापल्या भागात लक्ष ठेवताना लोकांना वेळीण मदत पुरविण्याची सुचना केली आहे.

सोमवारी सुरु झालेल्या पावसाने डिचोली तालुक्मयात थेमान घातला आहे. तालुक्मयातील बहुतेक नद्या नाल्यांना जून महिन्याच्या पहिल्याच सप्ताहात पाणी आलेले आहे. तर अनेक ठिकाणी पंचायती व नगरपालिकांमार्फत मोन्सूनपूर्व कामांबाबत बेपर्वाई करण्यात आल्याने पाणी तुंबून लोकांना त्रास होण्याचे प्रकार सुरूच आहे. पावसाची मोठी दडक आल्यानंतर पाणी रस्त्यावर व बाजारात तुंबण्याचे प्रकार घडतच आहेत.
बुध. दि. 3 जून रोजीही सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने जराही उसंत न घेता बरसात चालूच ठेवल्याने जनजीवन विस्कळीत झाले. लोकांना बाहेर पडण्यात मोठय़ा कठीण परिस्थितीचा सामनख करावा लागला. सध्याच्या लॉकडाउनमुळे पावसाशी संलग्नित अनेक माल बाजारात दाखल झालेला नसल्याने लोकांना पहिल्याच आणि वेळेपूर्वीच आलेल्या या अनपेक्षित पावसाचा सामना करण्यास कठीण वाटत आहे.
डिचोलीच्या साप्ताहिक बाजारावर पावसाचे पाणी
बुधवार हा डिचोलीचा साप्ताहिक बाजाराचा दिवस असल्याने जोरदार पावसामुळे व्याटाऱयांना बाजाराचे सामान मांडताच आले नाही. विशेषतः सुकी मासळी विक्री करणाऱया गोमंतकीय महिला विपेत्यांची समस्या झाली. पूर्वीच लॉकडाउनमुळे या सुकी मासळी विक्री करण्याच्या मोसमात मासळीची विक्री करणे या विपेत्यांना शक्मय झाले नसल्याने आता कुठेतरी किंचितसा बाजार सुरू झाल्यानंतर त्यांना आपला माल विक्री करण्याची आशा होती. मात्र या आशेवर सध्या तरी पावसाने पाणी फेरले आहे. पावसाचा जोर चालूच राहिल्याने या सुकी मासळी विपेत्यांनी दुपारीच आपले सामान गुंडाळले. त्यामुळे सुकी मासळी विकत घेणाऱयांसमोरही समस्या निर्माण झाली. तर इतर भाजीपाला व इतर बेगमीच्या सामानाची विक्री गणेश पूजन मंडपात संबंधीत विपेत्यांनी केली.
पाणी तुंबण्याचे प्रकार सुरूच
डिचोली तालुक्मयातील पंचायती व नगरपालिका क्षेत्रांमध्ये अजूनही मोन्सूनपूर्व कामांबाबत बेफिकीरपणा झाल्याने अनेक ठिकाणी गटरे तुंबून चिखल व माती मिश्रीत पाणी रस्त्यांवर साचण्याचे प्रकार चालूच आहे. अनेक ठिकाणी राज्य महामार्गां®³ाा बाजूला असलेली गटरे वर्ष परंपरेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ न केल्याने महामार्ग रस्त्यांवरही पाणी तुंबून राहत आहे. याचा मोठा त्रास स्थानिक लोकांना सहन करावा लागत आहे. डिचोली ते साखळी या राज्य महामार्गादरम्यान कारापूर तिस्क ते वाळवंटीच्या पुलापर्यंत गटर व्यवस्था कोलमडलेली आहे. काही ठिकाणी कारापूर सर्व पंचायतीने गटरांची साफसफाई आपल्या खर्चातून केली होती. मात्र सदर गटरे सलगपणे नसल्याने आज पावसात माती व चिखल रस्तावर येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकी चालकांना धोका निर्माण झाला आहे.
वायंगिणी मये, साळ येथे झाडांची पडझड.
वायंगिणी मये येथील हनुमान गावकर व देविदास गावकर यांच्या घरावर जोरदार वारे आणि सततच्या पावसामुळे आंब्याचे झाड कोसळल्याने प्रत्येकी 50 हजार व 30 हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील कोणालाही कोणतीही इजा झाली नाही. घराच्या छप्पराची मोडतोड झाली. त्यामुळे त्यांच्या घरात पावसाचे पाणी पसरले आणि घरातील सामानांची काही प्रमाणात नुकसानी झाली. तसेच साळ येथील भुमिका मंदिराच्या जवळ एक झाड पडले. या झाडामुळे कोणतीही हानी झाली नाही. या दोन्ही घटनांच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यासाठी डिचोलीचे मामलेकर प्रवीणजय पंडित यांनी संबंधित तलाठय़ांना सुचना केली आहे.
सर्व तलाठय़ांना सतर्क राहण्याची मामलेदारांकडून सुचना.
गोव्यात वादळी वाऱयाची शक्मयता वर्तविण्यात आल्यानंतर तसेच सध्या सलगपणे तीन दिवस पावसाची बरसात चालूच असल्याने डिचोली तालुक्मयातील सर्व पंचायतक्षेत्रात या परिस्थितीमुळे घडणाऱया सर्व घटनांवर लक्ष ठेवण्याची सुचना मामलेकर प्रवीणजय पंडित यांनी सर्व तलाठय़ांना तसेच आपत्कालीन यंत्रणेला केली आहे. कोणत्याही प्रकारची घटना घडल्यानंतर नुकसानग्रस्त लोकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रत्येकाने कार्यरत रहावे, अशी सुचना पंडित यांनी केली आहे.









