प्रतिनिधी/ डिचोली
डिचोली तालुक्मयातील साखळी व साळ भागात काल रविवारी प्रत्येकी दोन कोरोना सकारात्मक रूग्ण आढळून आल्याने डिचोली तालुक्मयातील कोरोना बाधीतांची संख्या 13 झाली आहे. त्यापैकी 9 रूग्ण हे साखळी शहर परिसरातीलच आहेत. तर चार रूग्ण साळ या गावातून सकारात्मक आढळून आलेले आहेत. या सर्व रूग्णांशी संपर्कात आलेल्या शेकडो लोकांच्या स्वेब चाचणीला सध्या आरोग्य खात्यातर्फे प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान साळ गावातील चार जणांचे कुटुंब वगळता इतर सर्वांचे अहवाल नकारात्मक आलेले आहेत.
डिचोली तालुक्मयात सध्या कोरोनाचा धोका वाढत चालला असून व्हायरसच्या संसंर्गाला प्रारंभ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. साखळी शहर परिसरात सध्या कोरोना रूग्ण आढळलेले भंडारवाडा वरची हाळी, मुजावरवाडय़ानंतर आता देसाईनगरचा अर्धा भाग सील करण्यात आला आहे. त्यामुळे साखळी भागात कोरोनाच्या सं?संर्गाचा धोका मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. भंडारवाडा वरची हाळी व देसाईनगर येथील लोकांच्या स्वेब टेस्टला आज सोमवारपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी साखळी सामाजिक आरोग्य केंद्राचे अधिकारी उत्तम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची पथके तयार ठेवण्यात आली आहेत.
देसाईनगर येथे दोन रूग्ण आढळल्याने संबंधीत भाग सील
देसाईनगर साखळी येथे माजी आमदारा व त्यांच्या कुटुंबानंतर या भागातील दोन इसम कोरोना चाचणीत सकारात्मक आढळून आली आहेत. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिसांनी देसाईनगरचा अर्धा भाग पूर्णपणे सील केला आहे. या भागातील लोकांना आवश्यक सर्व सामान पुरविले जाणार असल्याचे मामलेदार पंडित यांनी सांगितले. यावेळी पाहणीस आरोग्याधिकारी उत्तम देसाई, साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर, स्थानिक नगरसेविका ज्योती ब्लेगन, रश्मी देसाई ब्रह्मानंद देसाई, आनंद काणेकर, तलाठी अजीत गावकर व इतरांची उपस्थिती होती.
देसाईनगर ग्रामस्था?नी कालच लागू केदा होता लॉकडाउन
साखळीत कोरोनाचा वाढता संसंर्ग लक्षात घेत देसाईनगर भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी देसाईनगर युनिटी या गटातर्फे देसाईनगर लॉकडाउनचे आवाहन केले होते. आठ दिवसांसाठी सदर लॉकडाउन काळात कोणीही घरातून बाहेर पडू नये, तसेच आपल्या घरातील वृध्द व लहान मुलांना घरातून बाहेर येऊ देऊ नये, अशी सुचना केली होती. व देसाईनगर भागात येणारे रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी सदर रस्ते खुले करण्याची सुचना केल्याने रस्ते खुले करण्यात आले. त्यानंतर देसाईनगरात दोन सकारात्मक कोरोना रूग्ण आढळल्याची वार्ता पसरताच खुद्द सरकारी पातळीवरच देसाईनगरचा अर्धा भाग सील करणे अधिकारी वर्गाला भाग पडले.
साळ गावातील पती पत्नीसह पूत्र आणि आईही कोरोना बाधीत.
साळ गावातील एक गोमेकॉ इस्पीतळातील आरोग्य कर्मचारी कोरोना सकारात्मक आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना मये रेसिडंसीत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तेथेच त्यांचे स्वेब टेस्ट काढले असता सर्वप्रथम त्याची पत्नी सकारात्मक आढळून आली होती. त्यानंतर आता त्याची आई आणि मुलगाही सकारात्मक आढळून आल्याने त्यांना कोवीड इस्पीतळात पाठविण्यात आले आहे. तसेच साळ गावात 25, 26 व 27 रोजी करण्यात आलेल्या स्वेब चाचण्यांपैकी सर्व अहवाल नकारात्मक आलेले आहेत. त्यामुळे साळ गावाला मोठा दिलासा मिळाला आहे.
डिचोली शहरातील खासगी डॉक्टर व कर्मचाऱयांचे अहवाल नकारात्मक.
साखळीत आढळून आलेला एक कोरोना सकारात्मक रूग्ण हा डिचोली शहरातील तीन खासगी डॉक्टरां?च्या क्लिनिकमध्ये गेला होता. त्यामुळे सदर क्लिनिकमधील तीन डॉक्टरांसह कर्मचाऱयांचीही स्वेब चाचणी घेण्यात आली होती. ते सर्व अहवाल नकारात्मक आलेले आहेत. त्यामुळे डिचोली शहरातील लोकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कारापूर तिस्क परिसरात स्वेच्छा लॉकडाउन.
साखळी शहरी भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. आतापर्यंत साखळीत 9 कोरोना सकारात्मक रूग्ण आढळल्याने त्याचा प्रसार कारापूर सर्वण पंचायतीत होऊ नये यासाठी कारापूर तिस्क येथील व्यापाऱयांनी स्वेच्छा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारापूर तिस्क येथे तातडीने झालेल्या एका बैठकीला सरपंचा सुषमा सावंत, पंचसदस्य दामोदर गुरव, संतष गुरव, विष्णू मेणकुरकर, सोमनाथ मोरजकर व इतरांची उपस्थिती होती. कारापूर तिस्क भागातील दुकानदारांना लोकांनी फिरून जागृती करण्यात आली आहे. मात्र दुकाने व सर्व व्यवहार किती दिवस बंद ठेवायचे याबाबत ठोस निर्णय झालेला नसून आज सोम दि. 29 जून रोजी निर्णय होण्याची शक्मयता आहे. कारापूर तिस्क हा भाग साखळीला अत्यंत जवळचा असल्याने हा भाग लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सरपंचा सुषमा सावंत यांनी सांगितले. हे स्वेच्छा लॉकडाउन किमान चार दिवस तरी असणार. डिचोली येथील सरकारी कार्यालयातील एक कोरोना सकारात्मक रूग्ण कारापूर तिस्क येथील एका हॉटेलमध्ये चहा नाश्ता करण्यासाठी आला होता. त्यामुळे या हॉटेलमधील मालकासह सर्व कामगारांची स्वेब टेस्ट करण्यात आली आहे.









