डिचोली/प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषदेच्या रामोत्सव समिती डिचोली तर्फे “सार्वजनिक रामोत्सव 2022” चे आयोजन रविवार दिनांक 10 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संध्या. 6 ते 9 या वेळेत करण्यात आल्याची माहिती येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून विश्व्ा्र हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱयांनी दिली.
या उत्सवाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़?, नगराध्यक्ष कुंदन फळारी व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ज्योती प्रज्वलन, ऊ?कार, श्रीराम जप, प्रतीकात्मक रामजन्म, प्रस्तावना, श्रीराम माहात्म्य श्री. शांतीसागर हावळे कथन करणार आहेत. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून श्रीराम पूजन, आरती, व पसायदान व तीर्थ प्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषद गोवा प्रांत प्रभारी डॉ. मोहन आमशेकर, शंभू परब, उदय जांभेकर, सुर्यकांत देसाई, संजय नाईक, नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, आश्व्ा्राrनी पटवर्धन, उद्धव कशाळीकर, विजय तेलंग आदींची उपस्थिती होती.
डॉ.मोहन आमशेकर यांनी प्रारंभी विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. अयोध्येत राममंदिर लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचे सांगितले. हिंदूंच्या संघटनेसाठी सर्वांनी सक्रिय झाले पाहिजे व विविध उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.









