प्लांटद्वारे होणार कचऱयातून वीज व खत निर्मिती : सभापती राजेश पाटणेकर यांच्या हस्ते पायाभरणी,संपूर्ण कचराप्रक्रिया प्रकल्प आणि हा प्लांट वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार,सुमारे 2 कोटी खर्च
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली नगरपालिकेतर्फे राज्य नगरपालिका संचालनालयाच्या सहकार्याने लाखेरे डिचोली येथे नव्याने साकारण्यात येणाऱया बायो मिथेशन कचरा प्ला?टची पायाभरणी सभापती राजेश पाटणेकर यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. या बायो मिथेशन प्ला?टद्वारे सदर प्ला?टबरोबरच संपूर्ण कचरा प्रक्रिया प्रकल्पाला वीजेचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला होणारी वीज खात्याच्या वीजेची आवश्यकता भासणार नाही, असे सांगण्यात आले.
यावेळी सभापती पाटणेकर यांच्यासह नगराध्यक्ष कुंदन फळाली, उपनगराध्यक्षा तनुजा गावकर, नगरसेवक निलेश टोपले, सतीश गावकर, सुदन गोवेकर, विजयकुमार नाटेकर, अनिकेत चणेकर, दिपा शिरगावकर, दिपा पळ, एड. रंजना वायंगणकर, एड. अपर्णा फोगेरी, सुखदा तेली, गुंजन कोरगावकर, रियाझ बेग, पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, महिला नेत्या शिल्पा नाईक, पालिका अभियंता आशिक खान, राजेश फडते, प्रकल्पाचे अभियंता गौरव पोकळे, माजी नगरसेवक अजित बीर्जे, निसार शेख व इतरांची उपस्थिती होती.
राज्यातील सर्वात प्रथम कचरा.प्रक्रिया प्रकल्प साकारण्याचे भाग्य डिचोली नगरपालिकेला लाभले. राज्यात ज्यावेळी कचऱयाची समस्या उग्र बनू लागली होती त्यावेळीच डिचोली नगरपालिकेने लाखेरे येथे कचथा प्रक्रिया प्रकल्प उभारून डिचोली शहराला कचऱयाच्या समस्येपासून दूर ठेवले होते. त्याचप्रमाणे आता या नवीन बायो मिथेशन प्ला?ट उभारून दुर्गंधीविरहीत कचऱयावर प्रक्रिया केली जाणार आहे. आणि त्यातूनच वीजेची निर्मिती करण्यात येणार असल्याने पालिकेचा वीजेचा खर्च वाचणार आहे, असे सभापती राजेश पाटणेकर यांनी यावेळी म्हटले.
सुमारे 2 कोटी खर्च?न साकारण्यात येणाऱया या बायो मिथेशन प्ला?टमुळे डिचोली नगरपालिकेच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. या तसेच कचराप्रक्रीया प्रकल्पासाठी बोर्डे कोमुनिदादने चांगले सहकार्य केलेले आहे. तसेच सरकारचेही वेळोवेळी सहकार्य लाभत असल्याने डिचोली पालिकेच्या विकास प्रक्रीयेला आता वेग मिळला आहे, असे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी सांगितले.
लाखेरे भागातील लोकांची या कचरा प्रक्रिया प्रकल्पाविषयी दुर्गंधी येत असल्याची तक्रार होती. मात्र नगरपालिकेच्या या बायो मिथेशन प्ला?टमुळे ती समस्या दूर होणार आहे. या प्ला?टचा उपयोग डिचोली नगरपालिकेला चांगलाच होणार असून राज्यासाठीही हा प्रकल्प एक आदर्श बनणार आहे, असे स्थानिक नगरसेवक निलेश टोपले यांनी म्हटले.
डिचोलीत साकारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे डिचोली शहरातील कचऱयामुळे लोकांना कधीच त्रास झाला नाही. डिचोली नगरपालिका क्षेत्र सदैव स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न केला. तसेच हा कचार प्रक्रिया प्रकल्पाचीही निगा योग्यप्रकारे राखण्यात आल्याने या प्रकल्पाचीही कधी तक्रार निर्माण झाली नाही. त्याचप्रकारे हा बायो मिथेशन प्रकल्पही डिचोलीसाठी फायदेशीर ठरणार, असे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी म्हटले. यावेळी मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, प्रकल्पाचे अभियंता गौरव पोकळे यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. स्वागत निलेश टोपले यांनी केले. तर आभार विजयकुमार नाटेकर यांनी मानले.









