राजकीय प्रेरणेने आग लावल्याचा दाट संशय. सर्व उमेदवारांकडून निषेध व्यक्त. कसून चौकशी करण्याची मागणी.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली मतदारसंघातील भाजपचे जे÷ नेते वल्लभ साळकर यांच्या मालकीच्या एमजी हेक्टर या आलिशान गाडीला आग लावण्याची घटना रवि. दि. 11 फेब्रु. रोजी रात्री घडली. या घटनेचा डिचोली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेश पाटणेकर यांच्यासह मगोचे उमेदवार नरेश सावळ व अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनीही निषेध व्यक्त केला. या घटनेची डिचोली पोलिसांनी सखोल चौकशी करावी व संशयिताचा शोध लावावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.
सदर प्रकार साष्टीवाडा डिचोली येथे घडला. वल्लभ साळकर यांची जीए 04 ई 6474 या क्रमांकाची एमजी हेक्टर हि सुमारे 25 लाखांची आलिशान गाडी त्यांच्या इमारतीच्या खाली पार्क करून ठेवण्यात आली होती. रविवारी रात्री पाऊणेतीन वाजता अज्ञाताने सदर गाडीवर इंधन टाकून ती पेटविण्यात आली. हा प्रकार सदर इमारतीच्या बाहेर लावण्यात आलेल्या सिसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यानुसार पोलीस तपास सुरू आहे. याप्रकरणी वल्लभ साळकर यांनी पोलीस तक्रार नोंदवली आहे.
या प्रकरणी गाडीचे मालक वल्लभ साळकर यांनी तीव्र निषेध करताना आपण गेली तीस वर्षे राजकारणात असून अनेक निवडणुका केल्या. परंतु असा प्रकार कधीच अनुभवला नाही. हे काम गोव्यातील कोणाचे असू शकत नाही. कोण तरी राज्याबाहेरील व्यक्तीने हे काम केले असावे. यापासून लोकांनी आजच सावध होताना गोव्यात अशा वृत्तीला थारा देऊ नये. आपण या प्रकरणी कसून चौकशी करण्याची आणि संशयिताला गजाआड करण्याची मागणी करणार आहे. असे म्हटले.
डिचोलीत अशा प्रकारची कृत्ये यापूर्वी घडलेली नाही. असे प्रकार गोव्यातील राजकारणात नवीनच असून बाहेरून आलेले पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशी कृत्ये अपेक्षित आहे. अशा वृत्तीच्या पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून सावध रहावे, अशी प्रतिक्रिया सभापती राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केली.
या घटनास्थळी मगोचे उमेदवार नरेश सावळ यांनी भेट देत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. डिचोलीत राजकारण हे सदैव खेळीमेळीचे असायचे. मात्र सध्या या राजकारणात आलेल्या काही लोकांनी हे राजकारण वेगळय़ा वाटेवर नेऊन ठेवले आहे. गेल्या 2015 च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत एक गाडी फोडण्यात आली होती. आणि आज येथे गाडी जाळण्यात आली आहे. या दोन्ही घटनांचा संदर्भ जूळत असून अशा उमेदवारांपासून सावध रहावे, व पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी, असे आवाहन केले अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करताना या घटनेची पोलिसांनी कसून चौकशी करावी. अशा प्रकारची कृत्ये डिचोली मतदारसंघात कोण करू शकतो आणि कोण नाही. याची कल्पना सर्वांना आहे. असे म्हटले.









