वार्ताहर/डिगस-
डिगस गावामध्ये आपल्याला दुग्धक्राbती निर्माण करावयाची आहे. आपण संकाfलत करत असलेले दूध याला योग्य हमीभाव मिळावा हाच उद्देश साधून डिगस येथे गोकुळ दुध संघ सलग्न सुशिल दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था उभारण्यात आलेलीr आहे, तरी या संस्थेचा लाभ सवा¥नी घ्यावा असे आवाहन गोकुळ दुध संघ सिंधुदुर्ग दुग्ध संकलन अधिकारी श्री. रेडकर याbनी केले आहे.
यापुढे ते म्हणाले की, दररोज 22 हजार लिटर दूध संकलन करणारी गोकुळ दुध संघ आज सुशिल दुग्ध व्यवसायिक संस्थेद्वारे दुध संकलन करण्यासाठी आता आपल्या घरापर्यंत आलेली आहे. त्याचा लाभ येथील स्थानिक दुग्ध उत्पादक, संस्था सभासद, माfहला, शेतकरी याbनी घ्यावा. जेणेकरून तुमच्या या संस्थेला वेळोवेळी आमच्या संस्थेद्वारे मार्गदर्शन, प्रोlसाहन, योग्य मोबदला व हमीभाव आम्ही देऊ, जेणेकरून आपण या नवीन स्थापित दुग्ध संस्थेद्वारे आपण आपल्या गावात दुग्ध क्राbती निर्माण कराल असे प्रतिपादन सुशिल दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित डिगस लोकार्पनात त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर डिगस सरपंच सतीश सुर्वे, गोकुळ दुध संघाचे पर्यावेक्षक राजेश गावकर, संस्था अध्यक्ष संदीप राठोड, अरुण सावंत, पोलीस पाटील राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.









