हणजूण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /म्हापसा
हणजूण पोलिसांनी मुबीन खान रा. मुस्लिमवाडा डिचोली याला वागातोर येथे स्कूटरच्या डिकीतून कॅमेरा व मोबाईल चोरी करणाऱयास अटक केली आहे. तक्रार अर्जुन गोयल रा. दिल्ली यांनी नोंदविली होती की अज्ञात आरोपीने गोप्रो हिरो ब्लॅक कलर पॅमेरा रु. 40 हजार, 2 मेमरी कार्ड, ब्लू कॅमेरा कव्हर, कॅमेरा चार्चींग कव्हर मिळून रु. 800, लाल रंगाचे सनग्लासेस, आयफोन आयफोन चार्चर केबल आणि ओपो चे इअरफोन सर्व मिळून रु. 25 हजार, हिल टॉप, वागातोर बार्देश येथील पार्किंग एरियामध्ये पार्क केलेल्या स्कूटरच्या डिकीमधून 2 हजार घेतले.
यासंदर्भात या पोलीस ठाण्याचे कर्मचारी व स्थानिक माहिती देणाऱयांना सतर्क करून चोरी प्रकरणाची माहिती दिली. यादरम्यान एका व्यक्तीने दगडवर एक गोप्रो ब्लॅक कॅमेरा विक्रीसाठी ठेवल्याची विश्वासार्ह माहिती मिळाली आणि त्यानुसार डिकॉय ग्राहक बनविला गेला आणि विक्रेत्याला तो कॅमेरा देण्यासाठी हडफडे येथे येण्याची विनंती केली आणि एकाने मुबीन खान, मोहम्मद खान मुस्लीमवाडा बिचोली गोवा येथे डिलिव्हरी करण्यासाठी आलेला हा कॅमेरा पकडला गेला.
चौकशीत त्याने गुह्यात सहभाग असल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गोप्रो हिरो ब्लॅक कॅमेरा, मेमरी कार्ड, ब्लू कॅमेरा कव्हर, कॅमेरा चार्जींग केबल आणि आयफोन मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपी मुबीन खानला हणजूण पोलिसांनांनी अटक केली. निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम पेडणेकर अधिक तपास करीत आहे.









