वेंगुर्ले /वार्ताहर-
१ जुलै डाॅक्टर डे निमित्त रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या वतीने, वेंगुर्ल्यातील डॉक्टरांचा प्रातिनिधिक रोटरी सन्मान करण्यात आला. कोवीड महामारीच्या काळात , वेंगुर्ल्यातील अपुरी वैद्यकीय सेवा सुविधांच्या पार्श्वभूमीवर, वेंगुर्ला वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, करोनाबाधीत रुग्णांना वैद्यकीय उपचार व समुपदेशन करणारे डॉ. प्रल्हाद मणचेकर, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अतुल मुळे, संजीवनी हाॅस्पीटल करोना सेंटरचे डॉ. राजेश्वर उबाळे, केळुस ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरविणारे डॉ. होडावडेकर यां सर्वानी सातत्याने वेंगुर्ल्यातील रुग्णांना महत्वाची वैद्यकीय सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कुटुंबातील लोकांना मानसिक आधार , मार्गदर्शन व मदत मिळुन, अनेक रुग्णांचे प्राण वाचले. त्यांच्या या महत्वपूर्ण सेवेसाठी,रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० डॉक्टर सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन प्रेसिडेंट प्रा. सदाशिव भेंडवडे, सेक्रेटरीश्रृती सुरेंद्र चव्हाण, व्हाइस प्रेसिडेंट प्रा. डॉ.वसंत पाटोळे यांनी डिस्ट्रिक्ट असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ यांच्या उपस्थितीत सन्मान केला.