प्रतिनिधी\ सातारा
महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली व अद्ययावत नियंत्रण कक्ष पोलीस मुख्यालयात उभारण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीतून मिळालेली 71 वाहनापैकी 10 वाहनेही त्यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाला हस्तांतरीत करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, विभागीय पोलीस उपअधिक्षक आचंल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व पोलीस कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
गृहमंत्री वळसे-पाटील यांचे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्वागत केले. याप्रसंगी मंत्री वळसे-पाटील यांनी उर्वरित 10 वाहनांना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. ही वाहने लवकर संबंधित पोलीस स्टेशनला हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली व अद्ययावत नियंत्रण कक्ष हा पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेला आहे. या कक्षाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. पोलीस अधिक्षक बन्सल यांनी कक्षात किती व कशी यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. शहरातील विविध चौकात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही हे या कक्षाशी जोडलेले आहेत. यामुळे कोणतीही घटना घडताच व मदत पाहिजे. असल्यास तात्काळ फोन करताच मदत पोहविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही यंत्रणा बघून मंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांचे आणि संपूर्ण जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन केले. तसेच असेच चांगले उपक्रम राबवून नागरिकांना सुरक्षितता देण्यास प्रयत्न करा असे आवाहन केले.








