कोरोना काळात हे कसे चालते असा सवाल, पालकमंत्री यांनी लक्ष घालावे, अशी साद
प्रतिनिधी/सांगली
एका संस्थेच्या डायरेक्टरची हवेली आणि कोरोना काळात कडक निर्बंध, विकेंड लॉकडाऊन असताना तिथं सुरु असणारे एका चित्रपटाच्या चित्रीकरण याचा शनिवारी काही नेटकऱ्यांनी समाचार घेतला. याबाबत काहींनी पालकमंत्री जयंत पाटील यांनीच लक्ष घालावे, अशी साद घातली.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. सध्या कडक निर्बंध आहेत. गर्दीच्या अनेक कार्यक्रमांना बंदी आहे. यामध्ये चित्रपट, मालिका चित्रीकरणाचा देखील समावेश आहे. पण जिल्ह्यातील एका मोठ्या संस्थेचे चेअरमन यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण मात्र दिमाखात सुरु आहे. या चित्रीकरणाचा शुभारंभ एका नामांकीत संस्थेच्या डायरेक्टर यांच्या हवेलीत झाला. आणि सध्या महामारी सुरु असताना शनिवारी सकाळपासून पुन्हा येथे चित्रीकरणासाठी गर्दी झाली होती. सर्व नियम धाब्यावर नव्हे तर ‘ढगात’ पोहचवले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट गंभीर वळण घेत आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांची हॉस्पिटल आणि बेडस मिळवण्यासाठी पळापळ सुरु आहे. सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमांना मर्यादा आली आहे. इस्लामपूर शहर पुन्हा हॉटस्पॉट बनत आहे. मागील वर्षाप्रमाणे एकाच कुटुंबात अनेक रुग्ण सापडत आहेत.त्यामुळे धास्ती निर्माण झाली आहे. अशा वातावरणातच चेअरमन यांनी चित्रपट निर्मिती मध्ये पाऊल टाकले आहे. ते स्वतः रेटारेटीत माहीर आहेत.संस्थेचा कारभार जसा,रेटून व मनमानी पध्दतीने सुरु आहे, त्याचप्रमाणे या चित्रपटाचे चित्रीकरण देखील रेटून सुरु आहे.
Previous Articleराहुल गांधींच्या प.बंगालमधील सर्व सभा रद्द
Next Article खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची तीव्र कमतरता








