नवी दिल्ली : आयुर्वेदावर आधारीत उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेत डबर इंडिया या कंपनीने नवी उत्पादने बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. नियमितपणे वापरण्यात येणाऱया उत्पादनांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार असून यामध्ये लहान मुलांची देखभाल करणारी जवळपास 8 उत्पादने सादर होत आहेत. कंपनीने चाईल्ड केअर वर्गवारीचा विस्तार करण्यासोबतच अन्य उत्पादनांचीही घोषणा केली. सदरची उत्पादने ग्राहकांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ई कॉमर्स प्लॅटफार्म ऍमेझॉनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या सेगमेंटमध्ये पहिल्यापासून जॉन्सन ऍण्ड जॉन्सन, नेस्ले, हिमालयन ग्लोबल कार्यरत आहे. सध्या कोरोना कालावधीत लहान मुले, महिला आणि वयस्कर आदीच्या आरोग्याच्या काळजीसाठी त्यांच्याशी संबंधीत बेबी केअर उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे मार्केटिंग प्रमुख अजय सिंह परिहार यांनी म्हटले आहे. डाबरचे आयुर्वेद उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी कंपनी मोबाईल दुकानदारांना डाबर इम्युनिटी व्हॅन चालविण्याची अनुमती देणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. या व्हॅनच्या आधारे ग्राहकांना घराच्या जवळच थेट डाबर उत्पादने विकत घेण्याची सुविधा मिळणार आहे. ही इम्युनिटी व्हॅनसेवा देशातील 10 शहरांमध्ये उपलब्ध केली जाणार असून नंतरच्या काळात छोटय़ा व मध्यम वस्तीच्या शहरांमध्येही ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. अल्पावधीतच हा उपक्रम यशस्वी होईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.
Previous Articleरेल्वेने येणाऱया चाकरमान्यांची होणार आरोग्य तपासणी
Next Article माणुसकीचा ओलावा पैशाच्या उबेपेक्षा श्रेष्ठ असतो.
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.