ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने हाहाकार माजला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या विषाणूचा शिकार बनले आहे. त्यातच आता ‘डान्स दिवाने 3’ शोचा जज धर्मेशनंंतर आता या शोचा होस्ट राघव जुयाल याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. राघव याने स्वतः याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली आहे.

तो आपल्या पोस्टमध्ये म्हणाला की, ताप आणि सर्दी झाली असल्याने मी माझी कोरोना चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मागील काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि सतर्क राहून सुरक्षित राहावे.
दरम्यान, यापूर्वी सुरुवातीला ‘डान्स दिवाने 3’ च्या सेटवर 18 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शोचा जज धर्मेशचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झाल्यानंतर सध्या धर्मश होम क्वॉरंटाईन आहे. दरम्यान, धर्मेश व्यतिरिक्त शोचे जज माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार, गोविंदा, कैटरीना, आलिया, गायक आदित्य नारायण पत्नी श्वेता अगरवाल, अभिनेत्री भूमी पेडणकर, विक्की कौशल, कॉमेडीयन कुणाल कामरा, शशांक खेतान, मनोज बाजपेयी, यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.









