कोरोना संसर्गासंबंधी माहिती जमविणार : दीर्घकाळ चालणार चौकशी
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
जगात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. ही महामारी चीनच्या वुहान शहरातून डिसेंबरमध्ये फैलावण्यास प्रारंभ झाला होता. या महामारीसंबंधी योग्यवेळेत माहिती न दिल्याचा आरोप चीनवर आहे. चीनच्या या वेळकाढूपणामुळेच केवळ 2 महिन्यांमध्ये हा संसर्ग जगभरात पसरला आहे. परंतु हा संसर्ग कसा फैलावला याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चालू आठवडय़ात चीनमध्ये जाणार आहे. या महामारीसंबंधी पहिली माहिती चीनने नव्हे तर आपण दिली होता, असा संघटनेने केला आहे.
चीनमधील स्थानिक डब्ल्यूएचओ कार्यालय व्हायरल न्युमोनियाच्या प्रकरणांवर वुहान म्युनिसिपल हेल्थ कमिशनकडून माहिती प्राप्त करणार आहे. याप्रकरणाची चौकशी 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ चालणार आहे.
डब्ल्यूएचओने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रम्प यांनी महामारी रोखण्यासंबंधी आवश्यक माहिती देण्यास अपयशी ठरल्याचा आणि चीनबद्दल नरमाईची भूमिका स्वीकारल्याचा आरोप ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर केला होता. चीनने कोरोना विषाणू फैलावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महामारीसंबंधी डब्ल्यूएचओने प्रारंभिक टाईमलाईन 9 एप्रिल रोजी प्रकाशित केली होती. हुबेई प्रांताच्या वुहान शहरातील आरोग्य आयोगाने 31 डिसेंबर रोजी न्युमोनियाच्या रुग्णांची माहिती दिल्याचा यात उल्लेख आहे.









