प्रतिनिधी / ठाणे
ठाण्यात परदेशातुन आलेल्या नागरिकांची त्याच्या सम्पर्कातील नागरिकांची एक महिन्यात २ हजार २१२ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली.ठाण्यात ३०एप्रिलपर्यंत ११ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले तर दोन आठवडयात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण ठाण्यात आढळला नसल्याने ठाणेकराणा दिलासादायक बातमी होती अचानक ठाण्यात एका खाजगी डॉक्टरालाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्याला उपचारार्थ ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु आता त्याच्या दवाखान्यात मागील तीन ते चार दिवसात कीती रुग्ण येऊन गेले याची माहिती पोलिसांनी आणि आरोग्य विभागाने काढली असताना असताना साधारण अंदाजे ५० रुग्ण आल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यात गुरुवारीर्पयत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही १३ वर पोहोचली आहे
ठाण्यात १ मार्च ते २ एप्रिल दरम्यान ९८९ परदेशी प्रवासी आणि त्याच्या संपर्कातील १ हजार २२३ लोकाचा समावेश आहे.यामध्ये २ हजार ६९ लोकांना होम क्वॉरन्टाइन केले यामध्ये ८२ फॅसिलिटी क्वॉरन्टाइन तर ६४ लोकांना कस्तुरबा मध्ये पाठविण्यात आले तर ५ जणांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी ९ लोकांना रुग्णालयात दाखल न करता डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ४५ लोकांना रुग्णालयातून घरी पाठविले सध्या कस्तुरबा रुग्णालयात १५ रुग्ण ऍडमिट आहेत यामध्ये १३ रुग्णाची तपासणी पॉजिटीव्ह आली आहे. ठाण्यात दोन दिवसात एकाहि रुग्णाची भर पडली नसताना ठाण्यातील काजुवाडी भागात दवाखाना चालवित असलेल्या एका खाजगी डॉक्टरालाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या डॉक्टर रुग्णाला कस्तुरबा येथे बुधवारी रात्री हलविण्याची तयारी सुरु होती .परंतु तेथे बेड उपलब्ध नसल्याने अखेर गुरुवारी सकाळी त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे..त्यानंतर या डॉक्टरची पत्नी आणि मुलाला मानपाडा येथील त्यांच्या घरातच होम क्वॉरान्टाईन करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे या डॉक्टराची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला ही बाधा झाली असावी अशी शक्यताही वर्तविली जात असतानाही पोलिसांनी ५० रुग्ण त्या डॉक्टरच्या संपर्कात आल्याचा अंदाज वर्तविला आहे त्यामुळे ठाणोकरांच्या चितेंत भर पडली आहे.
खागजी रुग्णालय आणि हॉस्पिटलवर आयुक्ताचे कारवाईचे आदेश
ठाण्यात कोरोना रुग्णाची माहिती ठाण्यातील खाजगी रुग्णालय आणि हॉस्पिटल लपवीत असल्याची माहिती निदर्शनास आल्याचे ठाणे महानगर पालिका हद्दीत खाजगी रुग्णालय आणि हॉस्पिटल करोना रुग्णाची माहिती लपवीत असल्यास त्याच्यावर पालिका झोन नुसार उपायुक्तांना कडक कारवाई करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्त विजय सिंगल यांनी गुरुवारी दिली आहे.









