वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताकडून मागील वर्षात जी चीनी ऍप्स बंद केली त्यामध्ये सर्वाधिक वापरण्यात येणारे ऍप म्हणून टिकटॉकची ओळख राहिली आहे. या संधीचा फायदा घेत आता ट्विटर भारतामध्ये शॉर्ट व्हिडीओचा प्लॅटफॉर्म शेअरचॅट खरेदी करण्याचे संकेत आहेत, अशी माहिती एका अहवालामधून समोर आली आहे.
प्राप्त अहवालानुसार ट्विटरने शेअरचॅटला खरेदी करण्यासाठी 90 कोटी डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक केली असून या व्यतिरिक्त 1.1 अब्ज डॉलर्सची ऑफरही दिली आहे.
टिकटॉकने हटविले 92 टक्के व्हिडीओ
शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकने आपल्या एका अहवालामध्ये म्हटले आहे, की 2020 च्या दुसऱया सहामाहीमध्ये सामुदायिक उल्लंघन करणारा कंटेंट हटविला आहे. कंपनीने ग्राहकांकडून नोंदवण्यात आलेले जवळपास 92.4 टक्के व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरुन हटविले आहेत.









