ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ट्विटर आणि मायक्रो-ब्लॉगिंगचे सीईओ जॅक डोर्सी यांनी कोरोना विषाणूविरोधातील लढाईसाठी 7 हजार 620 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. डोर्सी यांनी ट्विटरवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे.
डोर्सी यांनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 28 टक्के वाटा दिला आहे. एक बिलीयन डॉलर म्हणजे जवळपास 7 हजार 620 कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.डॉर्सी यांनी यासाठी स्क्वेअर इन, या कंपनीमधील त्यांचा मालकी हक्क विकून पैसे उभे करणार असल्याचे म्हटले आहे.
जगभरात हातावर पोट असणाऱ्या कामगार आणि त्यांच्या संस्थांसाठी ही मदत करण्यात येणार आहे. तसेच मुलींचे आरोग्य आणि शिक्षणसाठी काम करणाऱ्या संस्थांनाही या निधीमधून मदत केली जाणार असल्याचे डॉर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. डोर्सी यांनीएका पब्लिक डॉक्युमेंटची लिंक शेअर केली असून, त्यावर डॉर्सी यांनी केलेल्या समाजकार्याची माहिती मिळणार आहे.