सातारा / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील बावधन येथील युवकाचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दिनेश चंद्रकांत नायकवडी (वय 36, रा. बावधन) असे मृत युवकाचे नाव आहे.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्यात सचिन भिकाजी ननावरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनेश ट्रक्टर (क्र. एम.एच.11डी. ए.1421) हा झरा नावाच्या शिवारात घेऊन गेला होता. तेथे चोबाना या ओढय़ातून जाताना भरधाव वेगातील ट्रक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरखाली सापडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलीस हवालदार वरखडे हे तपास करत आहेत.









