प्रतिनिधी / बार्शी
बार्शी / प्रतिनिधी
बार्शीत हायवेने येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत बार्शी शहर पोलिस ठाण्याचे हवालदार गंभीर जखमी झाले. लक्ष्मण भांगे असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर बार्शीतील सुविधा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि ६ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास भांगे हे बार्शीहून त्यांच्या चारचाकी वाहनाने गावी माढा येथे जात असताना मौजे वांगर वाडी फाट्याजवळ समोरून कुर्डुवाडी कडून भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच ४५ एफ ७८००हा ट्रॅक्टर ची एक हेडलाईट सुरू होती. त्यामुळे २० मिटर अंतरावर हा ट्रॅक्टर अचानक दिसला तरीही भांगे यांनी ब्रेक मारून स्वतःच्या ताब्यातील वाहन उभा केले. मात्र तरीही ऊसाने भरलेल्या ट्रॉली सह ट्रॅक्टरने भांगे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या धडकेने भांगे यांची कारचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून शरीराच्या इतर भागातही मार लागला आहे. याबाबत ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे









