प्रतिनिधी / मिरज
तासगाव ते कुमठे फाटा रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने आकांक्षा सतीश महापूरे (वय 15, रा. वलवन, ता. आटपाडी) ही तरुणी ठार झाली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
आकांक्षा आणि स्वप्नील हे दोघे मोटारसायकल (एमएच-10-एव्ही-2343) वरून तासगाव फाटा ते कुमठे फाटा या रस्त्यावरून जात होते. ते कांचनपूर फाट्याजवळ रवींद्र जाधव यांच्या मळ्याजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर (एमएच-10-4522) ने धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील आकांक्षा आणि स्वप्नील हे रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये आकांक्षा हिला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.








