ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल 20 हजारांहून अधिक खोटी वक्तव्य केल्याचा दावा फॅक्ट चेक वेबसाईट पॉलिटीफॅक्टने केला आहे.
ट्रम्प यांनी 2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांच्या खोट्या वक्तव्यांची मालिका कायम सुरूच राहिली. ट्रम्प यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात 20 हजारहून अधिक वेळा खोटी वक्तव्ये केली आहेत. प्रसारमाध्यमांनीही त्यांच्यावर नियंत्रण ठेवत सरकारचे वाभाडे काढले.
मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचा दावा ट्रम्प यांनी 262 वेळा केला होता. मात्र, वास्तविक पाहता तिथे काँक्रीटची एक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, आधीपासून असलेल्या कुंपणाच्या भागाला वाढवण्यासाठी हे काम करण्यात आले आहे.
तसेच ट्रम्प यांनी अर्थव्यवस्था मजबूत केल्याचा दावाही 407 वेळा केला होता. मात्र, बिल क्लिंटन, आयझनहावर आणि लिंडन बी जॉन्सन यांच्या काळात अर्थव्यवस्था अधिक चांगली होती. ट्रम्प यांनी अशाच प्रकारची खोटी वक्तव्य केली आहेत.









