ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुक, ट्विटर पाठोपाठ आता गुगलेनेही दणका देत त्यांच्या युट्यूब अकाऊंटवर 7 दिवसांसाठी बंदी घातली आहे. तसेच एक व्हिडिओ हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देऊन हटविण्यात आला आहे.
ट्रम्प समर्थकांनी संसदेच्या इमारती बाहेर केलेल्या हिंसक आंदोलनानंतर ट्रम्प यांचे फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. ट्रम्प युट्यूबचा वापर करून देशात अशांतता पसरवू शकतात. त्यामुळे गूगल व्यवस्थापनाने ट्रम्प यांच्या युट्यूबवर तात्पुरती बंदी घातली.
ट्रम्प यांना युट्यूबवर 7 दिवस कोणताही व्हिडिओ अपलोड करता येणार नाही. वेळ पडल्यास या हे निर्बंध अनिश्चित काळासाठी वाढविण्याचा इशाराही यूट्यूबने दिला आहे.









