ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील संसद भवनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांकडून झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्याकडून भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती ट्विटरने व्यक्त केली आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने ट्रम्प समर्थकांनी संसदेच्या इमारतीमध्ये गोंधळ घातला. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारची कोणतीही घटना भविष्यात घडू नये, यासाठी सावधगिरी म्हणून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, आम्ही भविष्यात एक नवा प्लॅटफॉर्म तयार करू.आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. ट्विटर आमचा अधिकाराची गळचेपी करत आहे. ट्विटरने डेमोक्रेटसोबत मिळून ही कारवाई केल्याचे ट्रम्प यांनी एका ऑफिशियल अकाऊंटवरून म्हटले आहे.