ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या कॅपिटॉल बिल्डिंगवर जानेवारी महिन्यात झालेल्या हल्ल्यानंतर प्रक्षोभक पोस्ट केल्यामुळे फेसबुकने ट्रम्प यांच्यावर ही कारवाई केली.
फेसबुकने म्हटले आहे की, चुकीच्या किंवा अपमानजनक पोस्ट शेअर करणाऱ्या राजकीय नेत्यांना आता सूट दिली जाणार नाही. ट्रम्प यांनी फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे होते. अन्यथा मागील टर्ममध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करणाऱ्या लाखो लोकांचा अपमान होईल.
दरम्यान, फेसबुकने ट्रम्प यांच्या अकाउंटवर 7 जानेवारीपासूनच बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी वाढवली जाऊ शकते, असेही फेसबुकने म्हटले आहे.