ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार झाला. सिक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ गोळीबाराला प्रत्युत्तर देत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्याबद्दल ट्रम्प यांनी सिक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
गोळीबार होताच ट्रम्प यांची पत्रकार परिषद अर्ध्यावरच थांबवण्यात आली. या गोळीबारात ट्रम्प यांना कोणतीही इजा झाली नाही, ते सुरक्षित आहेत. सिक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात यश आले असून, त्याला गोळी लागली आहे. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने ट्रम्प पुन्हा पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांनी या घटनेची माहिती पत्रकारांना दिली.









