ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग चालविण्याची मागणी करणारा ठराव उद्या (सोमवारी) डेमोक्रॅट्सच्या वतीने प्रतिनिधी सभागृहात मांडण्यात येणार आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने दोन दिवसांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी संसदेच्या इमारतीमध्ये गोंधळ घातला. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला होता. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ट्रम्प यांनी आपल्या हजारो समर्थकांसमोर केलेल्या भाषणामुळे हिंसाचाराला चिथावणी मिळाल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या लोकशाहीविरोधी कृत्याचा जगभरातून निषेध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला जाणार असल्याचे सांगण्यात येते.









