वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्यास अमेरिकेच्या ज्येष्ठ सभागृहाने (सिनेट) संमती दिली आहे. महाभियोग प्रक्रिया घटनेच्या मर्यादेत असून त्यामुळे महाभियोग चालविण्यास कोणतीही अडचण नाही, असा निर्वाळा सभागृहाने दिला. त्यामुळे बुधवारपासून महाभियोगास प्रारंभ झाला.
महाभियोगाचा परिणाम ट्रम्प यांच्या विरोधात जाण्यासाठी दोन तृतियांश बहुमत आवश्यक आहे. तथापि, एवढे बहुमत डेमॉपेटिक पक्षाकडे नाही. सध्या ज्येष्ठ सभागृहाच्या 100 सदस्यांपैकी 50 डेमॉक्रेटिक पक्षाचे त 50 रिपब्लिकन पक्षाचे आहेत. निर्णायक मत देण्याचा अधिकार अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांच्याकडे आहे. महाभियोग चालवण्याचा प्रस्तावाच्या बाजूने 56 तर प्रस्तावाच्या विरोधात 44 मते पडली. महाभियोगाचा परिणाम ट्रंप यांच्या विरोधात जाण्यासाठी किमान 67 जणांनी बाजूने मतदान करणे आवश्यक आहे.
मात्र, बव्हंशी रिपाब्लिक सदस्य महाभियोगाच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आल्याने ट्रम्प यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता नसल्याचे तज्ञांचे मत आहे. परिणाम त्यांच्या विरोधात गेल्यास ते भविष्यकाळात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, असे मत अनेकांनी व्यक्त केले होते. तथापि, तशी वेळ येणार नाही, हे आता स्पष्ट होत आहे.









