नवी दिल्ली
वाहनचालकांना जलद टोलचे पैसे भरण्याची व्यवस्था फास्टॅग कंपनीने केली असल्याचे सांगण्यात येते. याबाबतीत ट्रक मालकांना दिलासा मिळणार आहे. ट्रक मालकाचे पैसे जास्तीचे कापले गेल्यास ते लवकरच त्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. व्हील्सआयने फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुलीसंबंधात वाहनचालकांना तातडीने सूचना व पटकन पैसे परत करण्याची सुविधा नुकतीच सुरू केली आहे. व्हील्सआयने याकरीता आयडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली आहे.









