नवी दिल्ली
दुसऱया कोरोना लाटेचा परिणाम देशभर जाणवत असून तो ट्रक्टर विक्रीवरही जाणवणार असल्याची भीती एस्कॉर्टस लिमिटेड ग्रुपने व्यक्त केली आहे. आर्थिक वर्षाच्या दुसऱया सहामाहीत ट्रक्टर विक्री तुलनेत कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. लघुकालावधीसाठी ट्रक्टर मागणीला हवा तसा उठाव मिळणार नसल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जपानमधील कुबोटाच्या संयुक्त हातमिळवणी करणाऱया एस्कॉर्टसने 2021-21 मध्ये 55 टक्के इतकी निर्यात वाढ गृहित धरली आहे. यात युरोप देशात मागणी अधिक राहिली आहे. पहिल्या लाटेवेळी ग्रामीण भागात कोरोनाचा परिणाम नव्हता पण आता तो पोहचला असल्याने या क्षेत्रातून ट्रक्टर्सच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे.









