मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात : मृत सचिन सोनवलकर फलटण तालुक्यातील
प्रतिनिधी / सातारा
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर पनवेलजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात झाला. या अपघातात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा ट्रकच्या टायरखाली सापडून दुर्दैवी अंत झाला. सचिन सोनवलकर असे मृत पोलीस कर्मचाऱयाचे नाव आहे. पनवेल पोलीस टॅब येथे सचिन सोनवलकर डयुटीवर होते. सचिन सोनवलकर हे मूळचे फलटण तालुक्यातील दुधेबावी या गावचे आहेत.
एक्सप्रेस मार्गावर पनवेलजवळ गस्त घालत असताना पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱया लेनवर पुढे चाललेल्या ट्रकला मागून जात असलेल्या कंटनेरने धडक दिली. या अपघातात सचिन सोनवलकर सापडले व टायरखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला.
सचिन सोनवलकर हे मूळचे फलटण तालुक्यातील दुधेबावी या गावचे आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत. वडील मनोरूग्ण असून आई शेतीचे काम करते. सोनवलकर यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच दुधेबावी गावावर शोककळा पसरली आहे.









