ब्रेड-बटाटा अन् फळांनी बरेच काही तयार करते मुलगी
इन्स्टाग्रमावर सध्या चिनी कलाकाराने तयार केलेले टोस्ट अत्यंत पसंत केले जातात. ती हे सुंदर टोस्ट तयार करण्यासाठी ब्रेड, उकडलेले बटाटे आणि फळांचा वापर करते.
बहुतांश टोस्टवर फूल-पाने आणि कीडय़ांशी निगडित कलाकौशल्य असते. ब्रेडला एखाद्या कॅनव्हासप्रमाणे वापर करून मुलगी स्वतःच्या उपकरणांद्वारे अवघ्या मिनिटात सुंदर बगीचा किंवा फूल तयार करते आणि समोरचा पाहतच राहतो.

जियांग काईकाई नावाने स्वतःचे इन्स्टाग्राम अकौंट चालविणाऱया मुलीने यावर स्वतः तयार केलेले अनेक आर्टवर्क शेअर केले आहेत. यातील बहुतांश एडिबल आर्ट म्हणजे खाता येणाऱया गोष्टींनी तयार केलेल्या कलाकृती आहेत.
या असाधारण कलेसाठी ती फळे आणि उकडलेल्या बटाटय़ाचा वापर करते. ब्रेडच्या स्लाइसवर त्यांना सजविण्यात आल्यावर समोरचा दंग होतो. या खाण्याच्या गोष्टी आहेत का रंगांचा वापर करून तयार केलेले चित्र हेच त्याला उमगत नाही.
इन्स्टाग्रामवर चिनी कलाकाराला सुमारे 30 हजार लोक फॉलो करतात. ब्रेड स्लाइसेससह केकवरही टॉपिंग्स आणि आइसिंगचे ती काम करते. यातही बहुतांश करून निसर्गाशी निगडित दृश्यांना साकारते. ज्यांना भूक नाही ते देखील इतका सजविलेला टोस्ट पाहून नक्की डायनिंग टेबलवर थांबतील.









