श्री. छ. शिवेंद्रराजेंचा श्री. छ. उदयनराजेंवर घणाघात, कोणाचे संसार चालवले हे त्यांनी जाहीर करावे
प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांनी टोलनाक्याविरोधात लढा उभा केला होता. जकात महसूल लुटणाऱ्यांच्या विरोधात स्वराज्य उभं केले होते. परंतु आमच्या छत्रपती घराण्यात टोलनाके चालवणारे कसे जन्माला आले. टोलनाके चालवणारे दादागिरी करतात. लोकांकडून टोल गोळा करतात. टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी मला शहाणपण शिकवू नये, अशा शब्दात आमदार श्री. छ. शिवेंद्रराजे यांनी खासदार श्री. छ. उदयनराजेंचा समाचार घेतला. दरम्यान, त्यांनी अजिंक्यतारा कारखाना देशातल्या सक्षम कारखान्यापैकी एक कारखाना आहे. तुम्ही किती जणांचे संसार चालवता, अशीही त्यांनी विचारणा करत मिशा काढीन, भुवया काढीन अशा खूप वल्गना झाल्या त्यांच्या अशोक मोने निवडून आले तरीही त्यांच्या मिशा, भुवया तशाच होत्या, असाही टोला शिवेंद्रराजेंनी लगावला.
शिवेंद्रराजे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजेंचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, मी मुंबईला अधिवेशनात असताना उदयनराजेंनी माझ्याबद्दल आरोप केले होते. जी कामे राज्य शासनाच्या माध्यमातून आणली गेली. राज्य शासनाकडून ा†नधी उपलब्ध झाला त्यावर पण यांनी नारळ फोडायचे. सातारा शहर व हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सा†वधा ा†मळाव्यात यासाठी माझा प्रयत्न रा†हला आहे. शहराची हद्दवाढ करण्यासाठी मी आमदार म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री आ†जत पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. परंतु हद्दवाढीला विरोध त्यांनी केला. गेल्या पाच वर्षात अनेक कामे सत्तारूढ आघाडीला वेळेत कामे सुरू करता आलेली नाहीत. ठेकेदार आपल्याच मर्जीतला मिळवून ही कामे सध्या सुऊ आहेत. परवा गोडोलीत नारळ फोडण्याचा कार्यक्रम त्यांनी केला. ते काम मी मंजूर कऊन आणले. बोगदा रस्ता व इतर रस्ते डीपीसीतून मंजूर कऊन आणले. मी कधी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत नाही. पण हे मात्र आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यात पटाईत आहेत. माझं ते माझं आणि तुझं तेही माझचं असा त्यांच्या गुणधर्म आहे. ग्रेडसेपरेटरच्या कामाशी माझा काही संबंध नाही. काही लोक नेहमीसारखी डायलॉगबाजी करतात. ा†मशा काढतो, भुवया काढतो हे काढतो ते काढतो, हे सगळे सातारकरांना आता पाठ झाले आहे. अशोक मोने निवडून आले तरीही यांच्या मिशा तशाच होत्या. समोरासमोर येऊन बोलू असे आव्हान देतात ते मी त्यांच्या समोरच राहतो. जिल्हा बँकेच्यावेळेला ते आले होते समोर. काय झालं?, समोर आल्यावर काही होत नाही, गप्प बसतात. ा†जल्हा बँकेत संचालक होण्यासाठी त्यांच्याकडे राजकीय ताकद नव्हती. तेव्हा माझ्यासमोर येऊन बसले होते. त्यांना फक्त लोकांच्या भावनांना हात घालायला जमतं आणि डायलॉगबाजी करायला, अशा शब्दात खासदार उदयनराजेंचा आमदार शिवेंद्रराजेंनी खरपूस समाचार घेतला.
खासदार साहेबांनी नीट माहिती घ्यावी
ते नेहमी अजिंक्यतारा कारखान्याकडे बोट दाखवतात, अजिंक्य उद्योग समुहाबाबत बोलतात. त्यांनी अगोदर कारखान्याची निट माहिती घ्यावी. देशातल्या सक्षम कारखान्यापैकी अजिंक्यतारा हा सक्षम कारखाना आहे. कारखान्यांचा एनपीए चांगला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या दिवशी बील जमा होते. कारखाना पाच वर्ष प्रॉफिटमध्ये आहे. मी एकटा बसून ताळेबंद काढत नाही. खासदारांनी त्यांचा सीए आणून त्यांच्याकडून समजून घ्यावे. कारखान्याच्या एका वर्षात 360 कोटींची वार्षिक उलाढाल होते. कामगारांना 29 कोटी पगार दिला जातो. 40 कोटी अॅडव्हान्स शेतकऱ्यांना दिला जातो. सुतगिरणीवर 200 कामगार आहेत. त्यांच्या पगारापोटी 3 कोटी खर्च केले जातात. बोनससाठी 20 लाख खर्च केले जातात. मग पुन्हा अजिंक्यताऱ्याचे तुणतुणे बंद करावे. कुठल्याही ठेवीदाराचे पैसे बुडाले नाहीत. रितसर सर्वांचे पैसे मिळाले आहेत, असे सांगत सातारा पालिकेतील भ्रष्टाचार सगळ्या सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितला आहे. टेंडर स्वत:च्या मर्जीने द्यायचे. त्यांचेच नगरसेवक त्यांच्यावर आरोप करतात. घंटागाडीवाले तर आत्महत्या करायला निघाले होते. त्या भुयारी गटर योजनेचा प्रक्रिया करणारा प्लॅन्ट कुठे आहे?, पाच वर्ष काम सुऊ आहे 25 टक्के तरी झाले काय काम?, सर्वसामान्य स्त्रिला सत्ता देणार म्हणला पाच वर्ष. परंतु त्यांना पाच वर्ष निर्णय घेऊ दिला नाही.
घरकुल योजनेचे काम जरा पत्रकारांनी पहावे. मलिदा हाणला कोणी ते दिसेल तुम्हाला, असा प्रश्न शिवेंद्रराजेंनी पत्रकारांनाच करत सोनगाव कचरा डेपोत आता जावूयात का?, तसेच कचऱ्याचे ढिग आहेत. प्रक्रिया करणारा प्लँट कुठे आहे, असाही सवाल उपस्थित केला. खासदार साहेबांनी किती जणांचे संसार चालवले ते जाहीर करावे, असेही त्यांनी आवाहन केले.
शहरात पार्किंगचा एखादा प्लॉट आहे का?
काहीतरी पुण्य केले असेल म्हणून या घराण्यात जन्माला आलो असे ते सांगतात आणि आमच्यावर बोलतात. पण टोलनाके चालवणारे छत्रपती घराण्यात कसे जन्माला आले. हे आमच्या आईसाहेबांना विचारले पाहिजे. सुमित्राराजेंना. छत्रपती शिवाजी महाराजांनीच टोलनाके चालवणाऱ्यांच्या विरोधात लढले होते. खासदारसाहेबांची मात्र टोलनाक्यावर दादागिरी. टोल वसुली सुऊ असते. त्यांनीच टोल घेतला नाही पाहिजे. त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंना सुनावले. शहरात पाहणी केली पार्किंगचा एखादा प्लॉट सुऊ केला का त्यांनी अशीही टीका केली.
पेंटीग कऊन शहराचा विकास होत असेल भले
पेंटींगवऊन प्रश्न छेडला असता पेंटीग काढून शहराचा विकास होणार असेल तर भलेच की. चित्रकाराचे तेवढे बिल द्यावे म्हणजे झाले, असे उत्तर त्यांनी दिले.